कै. सतिशशेठ धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठान, पुणे
कै. सतिशशेठ मिसाळ यांच्याकडून मिळालेला जनसेवेचा वसा जपत कै. सतिशशेठ धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध लोकोपयोगी कामे आणि समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. समाजातील गरजू घटकांना मदत, धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन, तसेच वारकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सेवा उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेची ही परंपरा सातत्याने पुढे नेली जात आहे.
वारकरी सेवा
कै. सतिशशेठ धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठानतर्फे श्रीक्षेत्र पिराची कुरोली येथे वारकरी भोजनाचे आयोजन केले जाते. आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात भगवान श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमात जवळपास एक ते दीड लाख वारकरी भोजनाचा लाभ घेतात.












